नांदेड : आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय समन्वयक समितीने देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने कोविड -१९ चे नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांच्या विविध मागण्याचे वेगवेगळी दोन निवेदने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.आरोग्य विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी यांच्या कक्षात साधारणतः एक तास चर्चा करण्यात आली असून स्थानिक काही मागण्या सोडविण्यात संघटनेला यश आले आहे.
बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी
बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉ.विजय गाभणे, जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार, जिल्हा सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, वर्षा सांगडे, शिलाताई ठाकूर आदींची उपस्थिती होती. आरोग्य अभियानाच्या वतीने थोरात यांनी लेखी नोंदी घेतल्या आहेत.
जिल्हा परिषदेवर हजारोंचा मोर्चा काढणा-या सीटू संघटनेने कोविड – १९ चे नियम पाळून राष्ट्रीय संपाच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे.
घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी
शेतकरी – कामगार बेरोजगारांची निराशा करणारे बजेट – कामगार नेते डॉ. डी. एल. कराड