Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आयटक जन जागरण यात्रा नाशिक येथे जोरदार स्वागत!

कामगार कर्मचारी शेतकरी विरोधी भाजप सरकार  हटवा – कॉ.श्याम काळे

---Advertisement---

नाशिक : केंद्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी, शेतकरी, जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ २० नोव्हेंबर पासुन कोल्हापूर येथून आयटक ची राज्यव्यापी  महासंघर्ष सुरूवात झाली आहे. व नाशिक जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे आली. नाशिक येथे स. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. हुतात्मा स्मारक, सीबीएस नाशिक येथे अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ना अभिवादन करून आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा वतीने संविधान सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हार अर्पण करुन  पसा नाट्यगृह नाशिक येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेस जन जागरण यात्रा चे नेतृव करणारे आयटक राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, आयटक राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत, आयटक राज्य सचिव कॉ.राजू देसले, कॉ. सदाशिव निकम, कॉ. प्रकाश बनसोड, कॉ. कारभारी उगले, सखाराम दूर्गुडे भाकप नेते  कॉ.महादेव खुडे, टलहा शेख, दत्तु तुपे, अरूण म्हस्के, दत्ता गायधनी, शिवराम रसाळ, साहेबराव शिवले, शेखर मोघे, करुणासागर पगारे, महेश कदम, नितिन पाटील, पंडित कुमावत होते. तसेच नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी कृती समिती नेते, इंडिया आघाडी पक्ष नेते स्वागत केले. 

---Advertisement---

सभेच्या अध्यक्षस्थानी आयटक नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. व्हीं. डी. धनवटे होते. कामगार कर्मचारी कृति समिती चे प्रेस नेते जगदीश गोडसे, कामगार कर्मचारी संघटना कृती समिती राज्य समन्वयक तथा सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डी. एल कराड, इंटक बालासाहेब कासार यांनी शुभेच्छा दिल्या. 

आयटक राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत यांनी केंद्र सरकार सर्वसामान्य जनता विरोधी धोरण राबवत आहे. कंत्राटी कर्मचारी, मानधनावर वरील आशा गट प्रवर्तक कंत्राटी नर्सेस, अंशकालीन स्री परिचर  कोरोना योद्धा ना किमान वेतन दिले नाही. त्यांना कर्मचारी दर्जा द्या. सर्व योजना कर्मचारी ना कायम करा यासाठी आयटक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कॉ. श्याम काळे राज्य आयटक सरचिटणीस यांनी केंद्र व राज्य सरकारं कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. त्यांचा २०२४ मध्ये पराभव करा. अन्यथा भारतीय लोकशाही संकटात येईल. सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना, सर्व सामान्य जनतेने एकत्र येऊन परिवर्तन केले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारा दिलेले आश्वासन पाळली नाही. त्यांचा पराभव करा. येत्या १८ डिसेंबर रोजी यात्रा नागपुरात १लाख चा आयटक  चा भव्य मोर्चा विधान सभा वर आयोजित करण्यात आला आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

कॉ. राजू देसले राज्य सचिव आयटक यानी यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कामगार कर्मचारी, पेन्शनर ईपीएस यांना केंद्र सरकारने फसवले आहे. सर्व आशा गट प्रवर्तक, अंशकालीन स्री परिचर , हात पंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायात कर्मचारी, विज कर्मचारी, विडी कामगार, कामगार, शेतकरी, बांधकाम कामगार, मोलकरीण ना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लागू करा. त्या साठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. व भव्य मोर्चा १८ डिसेंबर रोजी आहे. त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. पसा सभा सुरुवात भारतीय संविधान प्रस्तविका वाचन प्राजक्ता कापडणे यांनी केले. ठराव सखाराम दुर्गडे यांनी केले. अनुमोदन दत्ता गायधनी दिले. आभार मीनाक्षी मोरे यांनी मानले.  

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉ. महादेव खुडे, कॉ . दत्तू तुपे, सखाराम दुर्गडे, पंडितराव कुमावत, सुनिता कुळकर्णी, तल्हा शेख, चित्रा जगताप, सुवर्णा मेतकर,  हसीना शेख, भीमा पाटील, विराज देवांग, प्राजक्ता कापडणे, दीपक गांगुर्डे, अनिल बीचकुल, शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय गांगुर्डे, राजेंद्र जगताप, साहेबराव शिवले, प्रमोद केदारे, समीरा शेख, कृष्णा शिंदे आदींनी केले आहे. 

Mahaegs Maharashtra Recruitment
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles