पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालय कौन्सिल हॉल येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या निमित्ताने धरणे आंदोलन आज सुरू झाले. निदर्शनांच्या दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष इंटकचे नेते कैलास कदम होते. बँक, विमा, बीएसएनएल, कारखाने, अंगणवाडी व आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत सिटूच्या वतीने कॉ. वसंत पवार, रजनी पिसाळ, शुभा शमीम, प्रकाश जाधव व अजित अभ्यंकर तसेच विविध क्षेत्रातील कामगार नेत्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांवर ताशेरे ओढले.
रजनी पिसाळ यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ न देऊन केंद्र व राज्य सरकारने त्यांनी कोरोना काळात अविरतपणे दिलेल्या सेवेकडे दुर्लक्ष करून त्यांचा विश्वासघात केला अशी खंत व्यक्त केली. शुभा शमीम यांनी कामकाजी महिलांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काय भोगावे लागले व आजच्या वाढत्या महागाईचा त्यांना कसा फटका बसला आहे, त्यांना केंद्र सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही, उलट या काळात अंबानी, अदानी यांना नफेखोरी करण्यासाठी खुली सूट दिली, यावर खरमरीत टीका केली.
आदिवासी विद्यार्थ्यांचे “आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे” येथे बेमुदत धरणे आंदोलन
अजित अभ्यंकर म्हणाले, “रोजगाराच्या बदलत्या स्वरुपाचे विश्लेषण करत मोदी सरकारने श्रमसंहितेद्वारे आणि कंत्राटी आणि फिक्स टर्मच्या नावाखाली कायम कामगार ही संकल्पना मोडीत काढली आहे. कामगारांना आपल्या कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी लढा देत असतानाच बेरोजगारी हटवण्यासाठी युवकांना सोबत घेऊन जोरदार लढा उभारण्याचे आवाहन केले.”
सभेमध्ये बीएसएनएलचे कॉ. जकाती, विमा क्षेत्राचे कॉ. चंद्रकांत तिवारी, बँक क्षेत्रातील कॉ. दगडू लांगी, आयटकच्या वतीने कॉ. अनिल रोहम व अरविंद जक्का, पोस्ट कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. ससाणे व अंगमेहनती कष्टकरी पंचायतीच्या वतीने नितीन पवार तसेच मानव कांबळे, मारुती भापकर या अन्य अनेक कामगार नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
आजच्या धरणे आंदोलनात बँक कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सिटूच्या सर्व क्षेत्रातील कामगारांचा व विशेषतः सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनात हवेली, उरळी कांचन, मावळ, पुणे शहर, घोरपडी कोंढवा, शिवाजी नगर, कोथरूड प्रकल्पातील सुमारे ७५० अंगणवाडी कर्मचारी सामील झाल्या होत्या.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !