मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलनंतर उसळी मारत असलेला शेअर बाजार प्रत्यक्ष निकाल येऊ लागताच धडामदिशी आपटला आहे. (stock market)
आज मंगळवारी गेल्या 4 वर्षांतील सर्वाधिक मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स 5 टक्क्यांहून अधिक आणि निफ्टी 6 टक्क्यांहून अधिक घसरला. बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 26 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. Sensex falls
निवडणुकीचे कल अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचं पाहून तसेच केंद्रात अस्थिर सरकार येण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला. त्यामुळं सेन्सेक्समध्ये 5 हजारहून अधिक अंकांची घसरण झाली तर निफ्टी 1600 अंकांनी खाली आला. यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 34 लाख कोटींचं नुकसान झाल असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. Mumbai
सकाळी 10 वाजता निफ्टीवरील सरकारी बँकेचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी खाली आले आहेत. बँक ऑफ बडोदा, पीएनबी, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक यांचे शेअर्स 6 ते 7 टक्क्यांनी घसरले आहेत. Share market news
अदानी, अंबानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण stock market
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या नेट वर्थलाही मोठा फटका बसला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2731.10 अंकांसह खालच्या पातळीवर पोहोचले. (Adani Group stocks faced a setback up to 18%)
अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मार, अदानी पॉवर या कंपन्यांच्या प्रमुख शेअर्समध्ये 14 ते 19 टक्के घसरण झाली.
शेअर बाजारातील पडझडीमुळे बीएसईच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, NTPC शेअर 19.68 पॉवरग्रिड शेअर 5.7 टक्के, टाटा स्टील शेअर 9.9 टक्के, टाटा मोटर्स शेअर 9.9 टक्के, भारती एअरटेल 9.8 टक्के, रिलायन्स 9.6 टक्के आणि एचडीएफसी बँकेचा शेअर 6.2 टक्क्यांनी घसरला.
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण