Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहर घर तिरंगा" अभियानामध्ये राष्ट्रप्रेमाचे सर्वत्र उत्स्फूर्त दर्शन, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप...

हर घर तिरंगा” अभियानामध्ये राष्ट्रप्रेमाचे सर्वत्र उत्स्फूर्त दर्शन, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रध्वज वाटप अभियान

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा समारोप करीत 76 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपा सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम राबवत राष्ट्रप्रेम जागृत केले जात आहे. यामध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, वाचनालयासह प्रमूख चौकामधील नागरिकांना तिरंगा ध्वज भेट दिला जात आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

भारत यंदा स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव साजरा करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी हर घर तिरंगा मोहिमेला दि. 2 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. हर घर तिरंगा अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. यामधून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, वाढविणे असा उद्देश आहे.

प्रदेश भाजपाच्या सूचनेनुसार, पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे हे अभियाने सर्वसामान्यांपर्यंत पोचविले जात आहे. लहान वयातच मुलांमध्ये देशभक्‍ती जागृत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सज्ञान देशभक्‍तांची पिढी निर्माण होईल. या उद्देशान शहरातील विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात जाऊन भाजपाचे पदाधिकारी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देत आहेत. या बरोबरच शहरातील प्रमूख चौकातील नागरिकांना देखील ध्वज देण्याचा स्तूत्य उपक्रम राबविला जात आहे.


भाजपाच्या प्रभागनिहाय बैठका

हर घर तिरंगा अभियान शहरात सक्षमपणे राबविण्यासाठी शहर भाजपाचे पदाधिकारी प्रभागनिहाय बैठकांचे सत्र आयोजित करत आहेत. त्यामध्ये हे अभियान कसे राबवयाचे, कोणते उपक्रम घ्यायचे या बाबत चर्चा केली जात आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते व ज्येष्ठ यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

प्रतिक्रिया

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता आणि 76 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाप्रसंगी देशप्रेमाचे दर्शन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात, राज्यात सुरु असलेल्या प्रगतीशील गतिमान वाटचालीमुळे जनतेत उत्स्फूर्त भावना दिसून येत आहे. शहरातील अबालवृद्धांमध्ये या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची भावना आणखी वाढली आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहोत.

– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय