Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविशेष लेख : महाराष्ट्राचा मंगल कलश समजून घेताना

विशेष लेख : महाराष्ट्राचा मंगल कलश समजून घेताना

क्रांतिकुमार कडुलकर-सामाजिक व राजकीय अभ्यासक

मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र सांकृतिक,राजकीय राज्य व्हावे,अशी अस्मिता बाराव्या शतकात जागृत होऊ लागली.ब्रिटिश राजवटीत मुंबई राज्य,मध्य प्रांत व हैद्राबाद संस्थानात मराठी भाषिक विखुरलेले होते.स्वतंत्र भारतात भाषिक प्रांतरचनेवर आधारित राज्य निर्मितीला राजकीय पाठिंबा मिळू लागला. १२ मे १९४६ रोजी बेळगाव मराठी साहित्यसंमेलनात मराठी भाषिक राज्यासाठी वैचारिक मंथन झाले. १० ऑक्टोबर १९५५ रोजी पंजाब,राजस्थान,मध्यप्रदेश,केरळ,कर्नाटक राज्यनिर्मिती साठी राज्य पुनर्ररचना आयोगाने नेहरू सरकारला शिफारस केली.आंध्रप्रदेश स्थापनेसाठी पोट्टू श्रीरामलू यांच्या उपोषण आंदोलनात त्यांचा मृत्यू झाल्यावर जण आंदोलन पेटले १ नोव्हेंबर १९५६ रोजी तेलगू भाषिक राज्य स्थापन झाले.त्यानंतर मुंबईतील समाजवादी,कम्युनिस्ट,पुरोगामी पक्ष संघटनांनी मराठी भाषिक राज्यासाठी जनआंदोलन सुरू झाले.



नव्या पिढीने इतिहास समजून घ्यावा

१ मे १९६० रोजी महाराष्ट राज्य स्थापन झाले.
एक समृद्ध महाराष्ट्र घडत होता,तो काळ मागील एकूण ५० वर्षाचा आहे.
या मंगल देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीचा लेखाजोखा समजून घेतला पाहिजे.
देशातील तिसऱ्या नंबरचे क्षेत्रफळ,७२० किमी समुद्रकिनारा,३६ जिल्हे,३५८ तालुके,२७८५५ ग्रामपंचायती,३५१ पंचायत समित्या,२७ महानगरपालिका, २८८ आमदार,४८ खासदार,१९ राज्यसभा खासदार आहेत.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीमुळे एकूण १९६ साखर कारखान्यांचे मोठे जाळे आणि साखर उत्पादनात नंबर दोन महाराष्ट्र राज्य आहे.सहकार चळवळीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात अर्थक्रांती झाली. महाविशाल,मध्यम,लघु उद्योगांची संख्या १७ लाख ४८ हजार आहे.महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण धरणांची संख्या ३,२६४ इतकी सांगितली जाते, तर या एकूण धरणात असणारा एकूण पाणीसाठ्याची क्षमता १७२० TMC असल्याची माहिती मिळते.महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी आहे,महाराष्ट्रात १० कार्यरत विमानतळ आहेत. ज्यापैकी ३ आंतरराष्ट्रीय व ७ देशांतर्गत विमानतळ आहेत. बाकी काही विमानतळ हे निर्माणाधीन आहेत.पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास झाला,उद्योगाची भरभराट झाली,औद्योगिक क्रांती झाली.



लोकनेते यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंत दादा पाटील,शरद पवार या मुख्यमंत्र्यांनी तसेच इंदिरा गांधी,राजीव गांधी,मनमोहनसिंग यांच्या काँग्रेस सरकारच्या काळात दूध क्रांती,हरित क्रांती यशस्वी,राजीव गांधी व शरद पवार,विलासराव देशमुख यांनी आयटी पार्क हिंजवडी येथे आणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर नेला. कृषी,औद्योगिक,शैक्षणिक,सांस्कृतिक प्रगती उल्लेखनीय झाली.

महाराष्ट्रात एकूण २३ राज्य विद्यापीठ (स्टेट युनिव्हर्सिटी) आहेत. त्याचे ११-सामान्य (१-महिलांसाठी), ४-कृषी, ३-विधी, १-वैद्यकीय, १-तंत्रज्ञान, १-पशु व मत्स्यविज्ञान, १-मुक्त व १-संस्कृत असे वर्गीकरण आहे.महाराष्ट्रात ५८९ रेल्वे स्थानके आहेत. मुंबई सेंट्रल, कल्याण, पनवेल, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ५ मुख्य महाराष्ट्र रेल्वे स्थानके/जंक्शन आहेत.जागतिक दर्जाची विद्यपीठे,महाविद्यल्ये महाराष्ट्रात आहेत.२९५ कृषी बाजारसमित्या मार्फत अब्जावधी रुपयांची अन्नधान्य,डाळी,कडधान्ये,दूध,फळे फुले भाजीपाला याची दररोज उलढालीचे महाराष्ट्र हे मोठे व्यापारी राज्य आहे.



इतर देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात मजुरी, किमान वेतनाचे दर सर्वात जास्त आहेत.त्यामुळे उत्तर भारत,किनारपट्टीतील व ईशान्य भारतातील राज्यातील लोक इथे रोजगारासाठी महाराष्ट्र पसंत करतात.सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेले हे आपले राज्य उद्योग,शेती,विज्ञान तंत्रज्ञान,अतिकुशल कामगार कर्मचारी, ४९ टक्के नागरिकीकरण इ सर्व क्षेत्रात प्रगत असे आहे.ब्रिटिश काळापासून टाटा,बिर्ला,बजाज,फिरोदिया,
किर्लोस्कर,कल्याणी,वाडीया,गोदरेज,गरवारे या उद्योगपतींनी कारखानदारीसाठी महाराष्ट्र पसंत केला,भारत सरकारने औषध,दारुगोळा,टेक्सटाईल,रिफायनरी,रेल्वे,ईई बहुमूल्य क्षेत्रात सरकारी उद्योगाचा विस्तार महाराष्ट्रात केला.परदेशी कंपन्यांना महाराष्ट्र महत्वाचा असल्याने विविध परदेशी उद्योग महाराष्ट्रात प्रथम आले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा


१० ऑक्टोबर १९५५ रोजी पंजाब,राजस्थान,मध्यप्रदेश,केरळ,कर्नाटक राज्यनिर्मिती साठी नेहरू सरकारला शिफारस केली.
राज्य पुनर्रचना समितीने ३० सप्टेंबर १९५५ ला एक रिपोर्ट सादर केला. त्यात गुजराथी प्रदेश व मराठवाडा धरून मुंबईचे द्वैभाषिक करावे.मग गुजराथ, महाराष्ट्र व मुंबई अशा तीन राज्यांच्या सूचना आल्या.मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही,यासाठी नेहरू सरकारने जाणीवपूर्वक ही राज्यनिर्मिती करण्याचे धोरण जाहीर केले.आणि तिथेच पहिली ठिणगी पडली.सेनापती बापट,कम्युनिस्ट नेते कॉम्रेड एस.ए. डांगे,एस.एम. जोशी,आचार्य प्र के अत्रे, प्रबोधनकार ठाकरे,इ नी मुबंई बेळगाव,कारवार सह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा बिगुल फुंकला.



संयुक्त महाराष्ट्र आंदोलन संपूर्ण देशात व जगात गाजले


संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी कामगार पक्ष,हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ तसेच शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,डाव्या पुरोगामी कामगार संघटना,विद्यार्थी,युवक,महिला संघटना विशेषतः मुंबईतील गिरणी कामगार संघटना आणि त्यांचे लक्षावधी मराठी कामगार या आंदोलनात मुंबईसह महाराष्ट्र राज्यनिर्मिती झाली पाहिजे,ही भूमिका घेतली होती.मोरारजी देसाई व काँग्रेस नेतृव गुजरात लॉबीच्या दबावाखाली त्रिराज्य निर्मितीसाठी दडपशाही करत होते.एस्. एम्. जोशी,भाई श्रीपाद अमृत डांगे,सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे,ना. ग. गोरे,आचार्य प्र. के. अत्रे,उद्धवराव पाटील, माधवराव बागल,प्रबोधनकार ठाकरे,अप्पा पेंडसे,तारा रेड्डी,गुलाबराव गणाचार्य,कुसुम रणदिवे,अशोक पडबीद्री,गोदावरी परुळेकर,अहिल्या रांगणेकर जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.तसेच लालबावटा कलापथकाचे शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर बाळ पाटसकर,शाहीर आत्माराम पाटील,शाहीर गव्हाणकर,शाहीर जंगम स्वामी ईई पुरोगामी शाहीर, लेखक विचारवतांनी मुबंई सह महाराष्ट्र निर्मितीसाठी वाणी,लेखणी खर्च करून महाराष्ट्र राज्य निर्मितीचे मोठे आंदोलन यशस्वी केले,या आंदोलनात १०५ हुतात्मे झाले,हजारो लोक तुरुंगात गेले.



शाहू,फुले,आंबेडकर,वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवूया


१९९० नंतरच्या जागतिकीकारणाने नव्या संधी,कार्पोरेट संस्कृती,राजकीय संस्कृतीचे संदर्भ बदलले.प्रागतिक विचारसरणीचा अंताला सुरवात झाली.क्रोनी कॅपिटलच्या प्रभावाने संपूर्ण राजकीय चित्र नकारात्मक दिशेने वाटचाल करू लागले.कामगार चळवळीचा अस्त झाला,नवमध्यमवर्गाने जागतिकीकरणाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला.त्याची राजकीय विचारसरणी बदलली.मागील २५ वर्षात महाराष्ट्रातील उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरित झाले.टाटा,महिंद्रा,बजाज,फिरोदिया ईई सारख्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या उद्योग समूहांनी नवीन प्रकल्प राज्याबाहेर नेले.

राज्यात सर्वमान्य लोकनेता नसल्यामुळे मागील दोन दशकात जागतिक संधी राज्यात कशा येतील,बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्र का पसंत करत नाहीत,यावर विधिमंडळात,सार्वजनिक व्यासपीठावर कोणतीही साधक,वैचारिक चर्चा राज्यकर्त्या वर्गाने केली नाही.वैचारिक समृद्धीचा अभाव असल्यामुळे २००९ पासून अस्थिर सरकार,पेंगाळलेली नोकरशाही,आयाराम-गयाराम राजकारण यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आभाळात काळे ढग दिसू लागले आहेत.
जागतिकीकरणाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे.



महाराष्ट्रात तरुणांची लोकसंख्या किमान ४ कोटी असू शकेल,२०११ नंतर जनगणना झाली नाही.आता चौथी औद्योगिक क्रांती वाणिज्य,कृषी,मेडिसिन,दळणवळण,कृत्रिम बुद्धिमत्ता,हवाई वाहतूक क्षेत्रात सुरू झाली आहे.’मला पण इथे संधी मिळाली पाहिजे–‘ ही तरुणांची मोठी आकांक्षा परिपूर्ण करायची जबाबदारी सर्व राजकिय विचारांच्या नेत्यांची आहे.
मागील दशकात येथील विद्यापीठे,महाविद्यालयात प्राविण्य मिळवलेले पदवीधर विद्यार्थी उच्च शिक्षण-नोकऱ्यासाठी युरोप,अमेरिकेत आकांक्षा पूर्ण करण्यासाठी निघून जात आहेत.बुद्धी-कौशल्याचे स्थलांतर वेळेत रोखले नाही तर ब्रेड ड्रेन होऊन राज्याच्या भावी विकासाचा पाया मजबूत होणार नाही.शाहू,फुले,आंबेडकर,वारकरी विचारांचा वारसा असलेला,यशवंतराव चव्हाण यांनी आणलेला हा मंगल कलश चंद्र सूर्य असेपर्यंत सुमंगल राहो,हीच ईच्छा!

संबंधित लेख

लोकप्रिय