नुकताच प्रदर्शित झालेला नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.या चित्रपटाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायला सुरुवात केलेली आहे.चित्रपटाचा प्रीमियर शो सुद्धा पुण्यातील कोथरूड येथे हलगीच्या ठेक्यावर नाचत संपूर्ण कलाकारांनी कल्ला केला होता.आजच्या या विशेष लेखात जाणून घेऊ या झुंड नेमका आहे तरी काय?
विविध सामाजिक आशय यांचे चित्रपट बनवून मनोरंजनात्मक प्रबोधन हा नागराज मंजुळे यांचा मूळचा स्वभाव आहे. पिस्तुल्या या चित्रपटापासून झालेली ही सुरुवात थेट झुंड पर्यंत येऊन पोहोचते. वाटेमध्ये फॅन्ड्री, सैराट यासारखे मैलाचे दगड पाहायला मिळतात.सहज आणि सोप्या पद्धतीने गोष्ट सांगणे हे आटपाट प्रोडक्शन चे खास वैशिष्ट्.अत्यंत क्लिष्ट असणारा विषय सुद्धा सहज आणि साध्या पद्धतीने प्रेक्षकांना पचनी पडणं ही कला नागराज सरांना चांगली जमते.आपल्या चित्रपटांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यामध्ये नागराज सर आघाडीवर आहेत.
आता थोडं चित्रपटाविषयी:
उपेक्षित वस्ती मध्ये राहणाऱ्या मुलांना फुटबॉल चे धडे देणाऱ्या विजय बारसे यांच्या आयुष्यावरती हा क्रीडा चित्रपट साकारला आहे.बस्ती मधील मुलांचे जीवन ,त्यांच्या सवयी, व्यसने ,पोलिसांची धाड ,गरिबी आणि हलाखीचे जीवन हे अत्यंत सहजरीत्या साकारले आहे.एका एरियल शॉर्ट मध्ये गरिबी आणि श्रीमंती यामधील रेखा अगदी स्पष्ट दिसत आह.अमिताभ बच्चन यांना मुख्य रोल मिळाला असून कलाकारांचे काम त्याच ताकदीचे आहे.चित्रपटाची गाणी श्रवणीय असून अजय अतुल यांनी त्यात जान ओतली आहे.
या चित्रपटाद्वारे समाजामध्ये सोशल मीडियावर दोन गटातून प्रतिक्रिया येत आहेत एक गट नागराज सरांचा तोंडभरून कौतुक करत आहे तर दुसरा गट त्यांना जातीवादी म्हणून हिनू पाहत आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की” मी कुठे चुकतोय ते मला दाखवून द्यावे पण सोशल मीडियावर नव्हे तर समोरासमोर मी माझ्या मध्ये बदल करीन”.चित्रपटामध्ये संवादा व्यतिरिक्त देहबोलीवरून सुद्धा अनेक संवाद घडतात जसे की फुटबॉलच्या मॅच ला प्रोत्साहन देणारे दादा ,फुटबॉल शिकू इच्छिणारा सिक्युरिटी गार्ड.शहरातील सुशिक्षित समजले जाणारे लोक जेव्हा भिंती बाहेर वस्तीमध्ये कचरा टाकतात तेव्हा त्यांना ती हक्काची जागा का वाटते? “अपनी बस्ती गटार मैं हैं पर तुम्हारे दिमाग मैं गंद हैं” हे वाक्य मनाला भेदून जाते.
एक निरागस लहान मुलगा जेव्हा भारत म्हणजे काय विचारतो तेव्हा स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे उलटली तरी खरंच तळागाळातील लोकांना ते कळाले आहे का असा सवाल पडतो.कागदपत्रे मिळवण्यासाठी पाड्या वरती राहणाऱ्या बाप-लेकीची कसरत या काळामध्ये सुद्धा तितकीच लागू पडते.आंबेडकर जयंती च्या वेळेस वर्गणी देणारा न देणारा गट अत्यंत उत्तम रित्या साकारले आहेत .बॉलिवूडला जे पन्नास वर्षात जमले नाही ते नागराज सरांनी करून दाखवले आहे.कोर्टाच्या सीनमध्ये जेव्हा अमिताभ सर असे म्हणतात,” ही मुले टॅलेंटेड आहेत ,एका दगडात हे डुकराला मारतात हे जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनू शकतात”. तेव्हा प्रेक्षकातून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येतात.
लोक दोन प्रकारचे असतात एक वस्तीमध्ये राहणाऱ्यांना वाईट आणि तुच्छ नजरेने बघतात परंतु दुसरे लोक त्यांच्यामध्ये राहून त्यांना सुधारण्याचे प्रयत्न करतात विजय बारसे हे त्यापैकीच एक.शेवटच्या फ्रेम मध्ये दाखवले आहे की, चौकट तोडून वस्ती मधल्या लोकांना दलदलीतून बाहेर काढणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी ज्यांनी याआधी चौकट ओलांडली आहे त्यांची आहे. असा अप्रतिम संदेश या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज सरांनी सबंध देशातील सुज्ञ नागरिकांना दिला आहे.त्यामुळे अधिक वेळ न घालवता लवकरात लवकर हा चित्रपट सहकुटुंब पहा .महाराष्ट्र जनंभुमी न्यूज तर्फे या चित्रपटास दहापैकी नऊ रेटिंग.
रत्नदिप सरोदे
( बारामती)