Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मराठवाड्याचे सुपुत्र, सुप्रसिद्ध रान कवी माजी आमदार ना धों महानोर यांचे निधन

पुणे / दि.०३-मराठवाड्याचे भुमीपुत्र,जेष्ठ साहित्यीक,मराठी कवितांना मातीचा गंध देवून ‘रानकवी’ अशी ओळख निर्माण करणारे पद्मश्री ना.धों.महानोर (वय ८१) यांचे दुःखद निधन झाले.महानोर यांचे आज दुःखद निधन झाले.

ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला.

२० दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ना. धो. महानोर यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

मराठी साहित्यविश्वामध्ये ते रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये बालकवींचा प्रभाव जाणवतो. त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्याचा वारसा समृद्ध केला. त्यांचे अनेक कवितासंग्रह गाजलेले आहेत. ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी, ‘रानातल्या कविता’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच. तसेच ना. धों. महानोर यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles