Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे

परभणी : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. या अहवालामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

---Advertisement---

अमानुष मारहाणीमुळेच Somnath Suryawanshi यांचा मृत्यू

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा दावा सुरुवातीला पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात पोलिसांच्या या दाव्याला पूर्णपणे फेटाळून लावले आहे. अहवालानुसार, सोमनाथ यांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यासाठी विरोधकांसह आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनेही केली होती. मात्र आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

---Advertisement---

दरम्यान, या अहवालामुळे सरकार आणि पोलिस प्रशासनावर दबाव वाढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आता पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप

राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर हिंसाचार प्रकरण ; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles