सोलापूर : गोदूताई परुळेकर (Godutai Parulekar) वसाहत येथे हजारो कामगार कष्टकरी राहतात. रात्रंदिवस मेहनत करून कसे बसे आयुष्याची गुजराण करतात. त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नसतात. म्हणून अनेक आजारांना ते बळी पडतात. म्हणून अशा श्रमिकांसाठी प्रामुख्याने आज संधिवात हा आजार बळावत चालला आहे. तसेच मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. (Solapur) यासाठी कॉ.गोदूताई परुळेकर (Godutai Parulekar) महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक तथा मुख्य प्रवर्तक माजी आमदार ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचे चिरंजीव संधिवात तज्ञ डॉ.किरण आडम व कन्या नीलिमा आडम (भाकरे) फिजीयोथेरपीस्ट यांचे मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक कॉ.विल्यम ससाणे यांनी दिली. Solapur
कॉ.गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी 10 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वसाहतीतील श्रमिकांसाठी संधिवात, मधुमेह, रक्तदाब, मोफत तपासणी व औषधोपचार शिबिर पार पडले. या शिबिरात साधारणतः सहाशे हून अधिक श्रमिकांनी तपासणी व औषधोपचार घेतले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Image-2024-03-10-at-4.26.22-PM-1-1024x576.jpeg)
यावेळी डॉ.किरण आडम यांनी रुग्णांशी संवाद साधताना म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या व्यस्त जीवनात आहार – विहाराची पथ्ये पाळली जात नाहीत. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यापैकी एक संधिवात हा आजार आहे. हा आधुनिक उपचार पद्धतीने पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो. त्यासाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
डॉ.किरणआडम (एम.डी.फिजिशियन), डॉ.नीलिमा भाकरे (फिजिओथेरपिस्ट), माधुरी आडम, सुमन देवकर, क्लिनिक लायबोरेटिक संतोस खेत, अमर आकेन, लखन गेजगे, श्रीकांत म्हैत्रे, सिद्धेश्वर ओशेट्टी, ईप्का लॅब लिमिटेड रमेश श्रीमल, शंकर बिंगी, गणेश कोक्कूल आदींनी वैद्यकीय सेवा बजावले.
ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, माजी नगरसेविका कामिनीताई आडम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, विल्यम ससाणे, ॲड.अनिल वासम, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, बापू साबळे, रफिक काजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी मोहन कोक्कुल , महिबूब गिरगावकर, गोविंद सज्जन, राजू रव्वा, अस्लम मुजावर, चंदू धोत्रे, शब्बीर नरुकाट, संतोष पुकाळे, प्रभाकर कलशेट्टी, प्रभाकर गेंट्याल, बालाजी तुम्मा, दिनेश बडगू, जाईद मुल्ला, योगेश अकिम, सुरेश गुजरे, डेव्हिड शेट्टी, नरेश गुल्लापल्ली, ऋषिकेश कटके, अफसर शेख, शफीक शेख, नवनीत अंकम, अफसाना बेग, शाम आडम आदींनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा :
धक्कादायक : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा
जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !