Thursday, July 4, 2024
HomeNewsसाेसायटी फेडरेशनकडून आमदार लांडगे यांच्या पुढाकाराचे कौतूक--शहरासह राज्यातील सोसायटीधारकांच्या समस्यांवर लक्षवेधीमुळे समस्यांचे...

साेसायटी फेडरेशनकडून आमदार लांडगे यांच्या पुढाकाराचे कौतूक–शहरासह राज्यातील सोसायटीधारकांच्या समस्यांवर लक्षवेधीमुळे समस्यांचे निराकारण होईल–संजीवन सांगळे

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सदनिकाधारकांना दिलासा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सोसायटीधारकांच्या भेडसावणाऱ्या समस्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सभागृहात चर्चेत आणणारे भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे शहरातील सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे.चिखली- मोशी-पिंपरी-.चिंचवड हाउसिंग साोसायटी फेडरेशनेचे अध्यक्ष संजीवन सांगळे य म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील सदनिकाधारकांच्या हक्कांसाठी आणि होणाऱ्या असुविधांबाबत आम्ही गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करीत आहोत. आमदार महेश लांडगे यांनी सर्वप्रथम सोसायटीधारकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एवढेच नाही, तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडून राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यात विधानसभेमध्ये नेतृत्व करणारे 288 आमदार आहेत. पण, सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी धडपडणारे एकमेव आमदार म्हणून महेश लांडगे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वेळकाढूपणा करणाऱ्या आणि सोसायटी धारकांच्या समस्यांचे केवळ राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात ही अंजन घालणारी बाब आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी सोसायटी धारकांच्या समस्यांबाबत लक्षवेधी लावली होती. या लक्षवेधीवर राज्य सरकारकडून सकारात्मक चर्चा झाली. सोसायटीधारक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील संघर्ष कमी व्हावा. समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी पुण्यात सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय समांत यांनी सभागृहात दिले आहे. त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

समस्या सुटतील असा विश्वास वाटतो : दत्तात्रय देशमुख
पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख म्हणाले की, सोसायटीधारकांच्या समस्यांबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र, आतापर्यंत हा घटक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने अक्षरश: दुर्लक्षीत होता. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून हा प्रश्न राज्य विधिमंडळाच्या सभागृहात चर्चेत आला. त्याला विरोधी पक्षानेही समर्थन दिले. कचरा, पाणी, बांधकाम व्यावसायिकांडून होणार त्रास या सर्वच मुद्यांवर आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले. आगामी काळात सोसायटीधारकांच्या समस्या सुटतील, असा विश्वास वाटतो.

सोसायटीधारकांकडून आमदार लांडगेंचे आभार : लक्ष्मीकांत बोंडे
आमदार महेश लांडगे यांनी सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. आतापर्यंत सोसायटीधारकांच्या न्याय मागण्या सरकारकडे मांडण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. पण, आमदार लांडगे यांनी सर्वच सोसायटीधारकांच्या मागण्या केवळ सरकारकडे मांडल्या नाही, तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे तमाम सोसायटीधारकांच्या वतीने आमदार लांडगे यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउससिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत बोंडे यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय