Friday, September 20, 2024
HomeNewsसिन्नर - प्रादेशिक संचालनालय नाशिक चे तीन दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम (TOT)...

सिन्नर – प्रादेशिक संचालनालय नाशिक चे तीन दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम (TOT) संपन्न

नाशिक : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड, प्रादेशिक संचालनालय – नाशिक द्वारा दिनांक 8 ते 11 ऑक्टोबर 2022 रोजी तीन दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम (TOT) online/offline – hybrid पद्धतीने संपन्न झाला.

नाशिक विभाजकाचे कार्यक्षेत्र हे 10 जिल्ह्यांची आहे. यात जळगाव, धुळे नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो. सरकारच्या बदलत्या धोरण प्रमाणे कामगार शिक्षणाचे स्वरूप देखील देखील बदलण्यात आले आहे. याची माहिती होण्याच्या दृष्टीने सदर प्रशिक्षणाचे नियोजन केले होते. नाशिक विभागाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता विभागाच्या मुख्यालयाच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन हायब्रीड मोडमध्ये करण्याचे नियोजन विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रभारी सारिका डफरे यांनी केले.

प्रशिक्षणार्थी नी त्यांच्या सोईप्रमाणे ऑनलाईन / ऑफलाईन जॉईन करून सदर प्रशिक्षण पूर्ण केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 8 ऑक्टोबर रोजी श्री वि गो पेंढारकर, अध्यक्ष – प्रादेशिक सल्लगार समिती, नाशिक यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाले. या प्रशिक्षणासाठी नाशिक विभागाच्या कार्यक्षेत्रातील NGO प्रतिनिधींनी तसेच facilitator ने सक्रिय सहभाग नोंदवला. सदर प्रशिक्षणात असंघटीत व ग्रामीण क्षेत्रातील कामगार शिक्षणाचे बदलते स्वरूप, त्यासाठी प्रशिक्षकांची जबाबदारी, कर्तव्य तसेच कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली.

सारिका डफरे यांनी प्रशिक्षनार्थी सोबतच प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत नवीन कामगार शिक्षण कार्यक्रमाचे विविध पेलू उलगडण्यात आले. सदर कार्यक्रमात गोविंदा साळुंके यांनी डिजिटल व financial लिटरसी या विषयावर चे ट्रैनिंग मोड्युल बद्दल सविस्तर प्रशिक्षण दिले. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी नाशिक कार्यलयात उपस्थित प्रशिक्षनार्थी व त्याचवेळी google meet च्या माध्यमातून उपस्थिती प्रशिक्षनार्थी ना विभागाच्या प्रादेशिक संचालिका सारिका डफरे यांनी धन्यवाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय