Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्रीरामपुर : भारतीय लहुजी सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, केली 'ही'...

श्रीरामपुर : भारतीय लहुजी सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, केली ‘ही’ मागणी

श्रीरामपुर : भारतीय लहुजी सेनाच्या वतीने नगर पालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी श्रीरामपुर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे स्मारक उभारण्याची मागणी केली, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय सचिव हानिफ पठान यांनी दिला. 

यावेळी भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲड. रमेश कोळेकर, जिल्हा अध्यक्ष रज्जाक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, महा. संपर्क प्रमुख शेख अहमद नसीर, उत्कृष्ट समाचारचे संपादक सलमान पठान, सिकंदर ताबोली, अमीर जागीरदार, अविनाश भोसले, किशोर त्रिभोवन, अमीत कुकरेजा, शुभम बागुल, शामकुमार श्रीवास्तव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय