Wednesday, July 3, 2024
Homeताज्या बातम्याMPSC चा सावळा गोंधळ; ऐनवेळी आणखी एक परीक्षा रद्द

MPSC चा सावळा गोंधळ; ऐनवेळी आणखी एक परीक्षा रद्द

MPSC Recruitment Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणारी लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गासाठीची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. MPSC Exam Postpone

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत 1 जुलै 2024 ते 13 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र 1 जुलै 2024 रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवभल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ शकली नाही. MPSC

एमपीएससीकडून लिपिक टंकलेखक पदासाठीची कौशल्य चाचणी परीक्षा आजपासून (ता.1) पवईतील आयओएन डिजिटल झोन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानक तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच परीक्षेची पुढील तारीख ही लवकरच कळवली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

परीक्षा रद्द का करण्यात आली?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आजपासून लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेचे वेळापत्रक प्रामुख्याने 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीत निश्चित करण्यात आले होते. मात्र, पवई येथील केंद्रात आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एमपीएससीचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. पहिल्या सत्रातील पेपरची वेळ सकाळी 9 ते 10 अशी होती. मात्र, 12 वाजत आलेले तरीही पहिल्या सत्रातील उमेदवारांना परीक्षेसाठी केंद्रात प्रवेश मिळालेला नव्हता. दुसऱ्या सत्रात परीक्षेची वेळही संपली होती. त्यामुळे तांत्रिक कारण पुढे करत परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की एमपीएसीवर ओढवली.

सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येणार!

यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन 1 जुलै 2024 ते 3 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 1 जुलै 2024 ते 3 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं एमपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट!

मात्र, लिपिक टंकलेखक पदाची कौशल्य चाचणी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले. पवईच्या परीक्षा केंद्राबाहेर गर्दी करत विद्यार्थ्यांनी परीक्षा आजच घेण्यात यावी. अशी मागणी लावून धरली. यावेळी केंद्राबाहेर संतप्त विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, टीसीएस या एमपीएससीची परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेने नव्याने होणाऱ्या परीक्षेची तारीख विद्यार्थ्यांना लवकरच कळवली जाईल, अशी अधिकृत सूचना दिली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना संतापला सामोरे जावे लागले.

MPSC

google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय