Friday, May 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

स्वमग्न (ऑटिझम) मुलांची थेरपीमुळे प्रगती होते-डॉ.निधी शहा

अभिसार फाउंडेशन:ऑटिझम डे संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: २ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने अभिसार फाउंडेशन वाकड व डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ सायकोथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने ४ एप्रिल २०२३ रोजी स्वमग्नता (ऑटिझम) डे साजरा करण्यात आला.” स्वमग्नता असणाऱ्या रुग्णांमध्ये लवकर निदान झाल्यास थेरपी मुळे त्यांच्या भाषा वाचा विकास होण्यास मदत होते.असे मत डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी च्या असोसिएट प्रोफेसर डॉ. निधी शहा यांनी व्यक्त केले.

यावेळी ऑटिझम विद्यार्थ्यांच्या योगा,नृत्य याचा सराव पीजीच्या विद्यार्थ्यांनी घेतला विकास जगताप क्रीडा प्रशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या तीन पायाची शर्यत, बदलीत बॉल टाकणे व पालकांच्या पावलांचा खेळ, संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या सर्व सहभागींना बक्षीस देण्यात आली.जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना एमआरकिट हरिदास शिंदे,अशोक सोलंके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच त्यांना खाऊ वाटप करण्यात आला व स्कूल बॅग चे वाटप केले यावेळी उपस्थित सर्व पालकांना रमेश मुसूडगे यांनी केंद्र शासनाच्या नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या “निरामय विमा योजना ” याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन प्राची पुराणिक, कल्पना मोहिते,ऋषिकेश मुसूडगे,योगेश आढळे,स्मिता हांडे पाटील, कुणाल गायकवाड,गोपेश कोठारी यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली खेडेकर तर भाग्यश्री कापसे यांनी केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles