Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी  :  अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं...

मोठी बातमी  :  अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी पवार गटाने 38 उमेदवार घोषित केले होते. या नवीन घोषणेमुळे आता अजित पवार गटाचे एकूण 45 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अजित पवार गटाच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांचे नावे :

1. इस्लामपूर – डॉ. निशिकांत पाटील

2. तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील

3. अणुशक्तीनगर – सना मलिक

4. वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी

5. वडगाव शेरी – सुनील टिंगरे

6. शिरूर – ज्ञानेश्वर कटके

7. लोहा – प्रताप चिखलीकर

विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. याच मतदारसंघात शरद पवार गटाकडून दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तासगाव-कवठे महांकाळमध्ये संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना तिकीट मिळाल्याने हा मतदारसंघ देखील लक्षवेधी ठरणार आहे. अजित पवार गटाच्या या दुसऱ्या यादीने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय