Friday, November 22, 2024
Homeराजकारण'सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता', चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी...

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांनी फोटो शेअर करत तो कार्यकर्ता भाजपाचाच असल्याचेच म्हटले होते. त्यामध्ये सौरभ पिंपळकर हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पहायला मिळतोय.

त्यानंतर भाजपावर सर्वत्र टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता आहे, परंतु ती धमकी नाही,’ असे बावनकुळे म्हणाले.

काल शरद पवार यांना दोघांकडून धमकी

शरद पवार यांना काल ट्विट व फेसबुकवरून धमकी देण्यात आली होती. पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन ‘नर्मदाबाई पटर्धन’ नावाच्या आयडीवरुन देण्यात आली आहे. ‘शरद पवार भाडखाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर दुसरी धमकी ही ‘सौरभ पिंपळकर’ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दिली आहे.

या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. धमकी देणाऱ्यांपैकी सौरभ पिंपळकर हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात होता. अखेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरभ पिंपळकर भाजपाचाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा :

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा कोणत्या पक्षाचा ?

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

संबंधित लेख

लोकप्रिय