कराड : देशात स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार मिळालेल्या कराड नगरपालिकेने शहरातील कचरा कृष्णा नदीच्या पात्रात जाळायला सुरुवात केली आहे. पर्यावरण कायद्यानुसार सर्वच कचरा एकत्र जाण्याऐवजी वर्गीकरण करणे गरजेचे आहे. परंतु हे नियमच धाब्यावर बसवले जात असल्याचं पहायला मिळत आहे.
कॉटन, रबर, प्लास्टिक, ओला, सुका इ सर्व प्रकारचा कचरा घंटागाडीतून गोळा करून त्याचे वर्गीकरण करायचे असते. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी कृष्णा नदीच्या पात्रात कचरा जळतात. सोमवारी संगम घाट परिसरातील रहिवासी या धुरामुळे परेशान झाले होते.
पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना सक्त ताकीद देऊन नियमानुसार कचरा विलगिकरणाचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
व्हिडिओ : महावितरण चे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल !
कर्मचारी राज्य विमा निगम येथे प्राध्यापक पदाच्या 218 जागांसाठी भरती !
व्हिडिओ : न्यूयॉर्क मध्ये दहशतवादी हल्ला, अनेक जण जखमी