मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत सामील होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे किस्से उघड केले आहेत. पवार यांनी सांगितले की, सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत त्यांनी दहावेळा बैठका घेतल्या आणि त्या बैठकींना जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे.
या खुलाशावर प्रतिक्रिया देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी म्हटले की, अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर काही लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून चौकशी होणे आवश्यक आहे. “अजित पवार यांनी प्रवासात बोर्डिंग कार्ड्स आणि ओळखपत्रे वापरली, ती जप्त करून त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. या कृतीने त्यांनी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा दिली आहे,” असे राऊत यांनी आरोप केले आहेत.
राऊत यांनी असेही म्हटले की, “ओळखपत्र नसताना कोणालाही विमानतळावरून सोडत नाहीत. त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.”
Ajit Pawar
या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा :
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’