Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू

सांगली : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide Dog Attack) यांच्यावर सोमवारी रात्री सांगली येथे भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भिडे यांच्या डाव्या पायाला जखम झाली असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली, जेव्हा भिडे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाचा कार्यक्रम आटोपून परतत होते. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)

---Advertisement---

संभाजी भिडे सांगलीतील एका धारकऱ्याच्या घरी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना रस्त्यावर एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने भिडे यांच्या डाव्या पायाला जोरदार चावा घेतला, ज्यामुळे त्यांच्या पायाचा लचका तोडला गेला. हल्ल्याच्या वेळी भिडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने कुत्र्याला हुसकावून लावले आणि भिडे यांना जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

भिडे गुरूजींवर कुत्र्याचा अचानक हल्ला | Sambhaji Bhide Dog Attack

प्रत्यक्षदर्शींनुसार, हल्ला इतका अचानक झाला की भिडे यांना संभाळण्याची संधीच मिळाली नाही. रात्रीच्या वेळी रस्ता तसा शांत होता. अचानक कुत्रा कुठूनतरी धावत आला आणि भिडे गुरुजींवर झेप घेतली. त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्याने त्यांचा पाय सोडला नाही. हल्ल्यानंतर परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते.  (हेही वाचा – एसटी प्रवास पुन्हा महागणार? आता नवीन कर लावण्याचा महामंडळाचा प्रस्ताव)

---Advertisement---

कोण आहे संभाजी भिडे ? | Sambhaji Bhide

संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. त्यांच्या वादग्रस्त चर्चांनी ते अनेकदा चर्चेत आले आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)

सांगली महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाजी भिडे यांच्यावरील भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles