Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सकल मातंग समाज : दवंडी यात्रा पुर्व नियोजन बैठक मुंबई येथे संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सकल मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी पुर्व नियोजन बैठक मुंबई येथे पार पडली. त्यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा झाली.

1) अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण
2) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था (आर्टी)
3) क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी महत्व पूर्ण बैठक मातंग समाजातील विविध संघटनेच्या प्रतिनिधीं व राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली.

---Advertisement---


या बैठकीला सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने युवराज दाखले यांनी सक्रिय जाहीर पाठिंबा व्यक्त करून 16 जुलै 2023 रोजी सामाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदीप झोंबाडे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आजी माजी अध्यक्ष, नगरसेवक यांच्या वतीने नियोजन बैठक पिंपरी चिंचवड शहरात घेणार असल्याचे समन्वयक युवराज दाखले यांनी बैठकीत जाहीर केले.

यावेळी सकल मातंग समाज समन्वयक समितीचे युवराज दाखले, रनधिर कांबळे, विश्नु कसबे, मुखेडकर सर, रमेश गालफाडे, शिवाजीराव खडसे, अशोक लोखंडे, सुरेशचंद्र राजहंस, राजाभाऊ सुर्यवंशी, भास्कर नेटके, शहीद संजय ताकतोडे यांचे भाऊ हनुमंत ताकतोडे, ॲड राम चव्हाण, शंकर कांबळे, मंगेश सुर्यवंशी, भगवान वैरागर, सचिन इंगळे, यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विधवा महिलांना तुच्छतेची वागणूक नको, त्यांनाही मानाचा दर्जा मिळाला पाहिजे – सीता केंद्रे

विशेष लेख : जीन्स पँटची निर्मिती कशी झाली व त्यामुळे कोणते तोटे झाले ?


PCMC : जागरूक नागरिकांनी 82 दिवसात मनपाच्या तिजोरीत 300 कोटी जमा केले

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles