Thursday, September 19, 2024
HomeNewsएस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय जडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील कलागुण विकसित केल्यास त्यांना जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल चौरे यांनी तर आभार प्लेसमेंट समितीच्या चेअरमन डॉ. हेमलता कारकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती किरवे यांनी केले.

हडपसर : एस. एम. जोशी कॉलेज येथे प्लेसमेंट सेल आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जॉब फेअर 2022-23 कंनेक्टींग टू फ्युचर’ हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या कल्पनेमधून सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲकॅडमी मधील अस्मिता राऊत उपस्थित होत्या.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील विविध स्किल डेव्हलप करायला पाहिजेत. तसेच इंग्रजी कम्युनिकेशन स्किल चांगले केल्यास त्यांना जगाच्या बाजारपेठेत मानाचे व सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. असे मत व्यक्त केले.

संबंधित लेख

लोकप्रिय