Monday, December 23, 2024
Homeग्रामीणनारायणगावात रोटरी क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

नारायणगावात रोटरी क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

नारायणगाव : नारायणगावात रोटरी क्लब नारायणगाव व सुभद्रानंदकुमार फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू, गुलाबपुष्प व फेटे बांधून अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी आयकर विभागाच्या उपायुक्त वैष्णवी बनकर, लेखिका, कवयित्री व समुपदेशक डॉ. रश्मी घोलप, तालुका बालविकास अधिकारी निर्मला कुचिक, जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, अनंतराव कुलकर्णी, स्कुलच्या मुख्याध्यापिका अनघा जोशी यांना “राजमाता जिजाऊ पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात नेत्रदिपक यश मिळविणारे विद्यार्थी मृदुला मेहेर, मैत्री गायकवाड, व ऋग्वेद काचळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष मंगेश मेहेर, पी.डी.सी.सी.बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्री बोरकर, डॉ.सरस्वती कणसे, डॉ.रश्मी घोलप, मुख्याध्यापिका अनघा जोशी, चार्टर अकाउंटंट सिद्धी वारुळे यांनी आपले विचार व्यक्त केले.

सामाजिक कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य बजावून कुटुंबाची व समाजाची अविरतपणे सेवा करणाऱ्या माता भगिनींचे कार्य निश्चितपणे अतिशय उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे मत रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी व्यक्त केले. तर महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला असल्याने स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो असे मत राजश्रीताई बोरकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.सरस्वती कणसे यांनी “महिलांचे आरोग्य व आहार” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सिमा कुलकर्णी, शितल ठुसे, पिंकी कथे, कमल पाटे, उद्योजक सतिश बनकर, शरद शिंदे, अरविंद ब्रह्मे, डॉ. आनंद कुलकर्णी, डि. डि. डोके, अशोक भराडिया, के.एस. बांगा, राजेंद्र बोरा, योगेश भिडे, सचिन घोडेकर, संदिप गांधी, हेमंत महाजन, डॉ.प्रशांत काचळे, माऊली लोखंडे, प्रा. लहू गायकवाड, ब्रिजेश बांदिल, कमलाकांत मुंढे, प्रशांत ब्रह्मे, प्रसाद बांगर, मनोहर वाघ, डॉ.सुषमा कुलकर्णी, अनुपमा ब्रह्मे, गिता डोके, शशिकला भराडिया तसेच रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य व महिला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन निर्मला मेहेर, रेखा ब्रह्मे, अमृता भिडे, प्रिया घोडेकर, डॉ.केतकी काचळे, प्रिया कामत, छाया गायकवाड, सिमा महाजन, वर्षा गांधी, रिनाली वामन, डॉ.अनिता उदमले, निशा बांदिल, स्मिता मुंढे, वंदना पटेल, सुनिता वाघ आदींनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रिया कामत यांनी केले तर डॉ.सविता भोसले यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय