झारखंड : येथील देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेचा भीषण अपघात झाला. देवघर डीसीच्या म्हणण्यानुसार, या अपघातात एका महिलेचाही मृत्यू झाला आहे, तर 8 गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 40 लोक अजूनही वर अडकले आहेत, ज्यांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अडकलेल्या प्रवाशांची सुटका करत आहे. एनडीआरएफ आणि आयटीबीपी यांचे जवान सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दूध एफ.आर.पी. साठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष – संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
JNU मध्ये पुन्हा राडा, abvp च्या गुंडांकडून विद्यार्थ्यास मारहाण