Monday, July 1, 2024
HomeNewsदेशभरातील रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवानाधारक, टू व्हीलर टॅक्सी मुळे अडचणीत आले...

देशभरातील रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवानाधारक, टू व्हीलर टॅक्सी मुळे अडचणीत आले आहेत-बाबा कांबळे

विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे रिक्षा संघटनांनसोबत बैठक

पुणे पिंपरी चिंचवड मधील टू व्हीलर टॅक्सी व इतर प्रश्नांसाठी मुंबई व दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलन करण्याची आवश्यकता, हा देशव्यापी प्रश्न आहे हे समजून घ्या

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:
टू व्हीलर रॅपिडो बाबत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रश्नावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. परिवहन विभागाने महाराष्ट्र शासनाला पत्र दिले आहे. ॲप तातडीने काढण्यासंदर्भात मागणी केली आहे. पुणे आरटीओने गुगल वितरण पत्र दिले आहेत. प्रशासकीय पातळीवरती आम्ही पूर्ण प्रयत्न करत असून मी लवकरच पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देणार असल्याचे पुणे विभागीय आयुक्त म्हणाले. याबरोबरच राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न सोडवले जातील. लवकरच संयुक्तपणे परिवहन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. स्थानिक आरटीओच्या प्रश्नांसंदर्भात मीटर कॅरीबॅशनची मुदत तातडीने वाढविण्याचे आदेश मी आता लगेच देतो, असे आश्वासन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विधान भवन येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र वरील मागण्या संदर्भात ठोस कृती न झाल्यामुळे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटून चर्चा केली.या वेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, ड्रायव्हर चालक-मालक संघटनेचे शिवा देशमुख, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, आम्ही सातत्याने आंदोलन, मोर्चा करत आहोत. 19 डिसेंबर रोजी रिक्षा चालकांनी आंदोलन केल्याने गुन्हे दाखल झाले होते. तरीही रिक्षा चालक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अनेक लोकांनी त्यांना सहभागी होऊ नका, असे सांगितले. तर काही लोकांनी सहभागी झाला तर पोलीस अटक करतील असेही सांगितले. तरी देखील रिक्षा चालक आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाची परिवाराची काळजी आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनात देखील कायदेशीर बाजू लावून धरली पाहिजे. बेकायदेशीर टॅक्सी तातडीने बंद करून मोबाईल ऍप्लिकेशन मधून हटवल्या पाहिजे ही मागणी अत्यंत रास्त आहे. कल्याणकारी मंडळाचा मुद्दा अत्यंत रस्ता आहे. या सर्व मागण्या का मान्य होत नाही, हा प्रश्न आता रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणे भेडसावत असून या प्रश्नांवरती रिक्षा चालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.
19 डिसेंबर रोजी आम्ही इशारा आंदोलन केला आहे. सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये. अन्यथा दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, बिहारसह देशभरामध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे परंतु स्थानिक पातळीवरती हा प्रश्न सुटत नाहीये यामुळे केंद्र सरकारने कायदे केले व राज्य सरकारने याबद्दल योग्य भूमिका घेतली नाही यामुळे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवरती आपल्याला लढावे लागणार आहे हे रिक्षा चालकांनी समजून घ्यावे आता हा लढा आपल्याला देशव्यापी करावा लागणार आहे पुढचा आंदोलन दिल्ली आणि मुंबई येथेच केले पाहिजे असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

या वेळी संघटनेने पुढील मागण्या मांडल्या –

१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.

२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.

३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.

४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.

५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.

६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय