खामगाव : सरकारी कंपन्या द्वारे भरती करण्याच्या निर्णयाविरोधात व महाराष्ट्रातील ६२ हजार जिल्हा परिषद शाळा खाजगी कंत्राटदारांना देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने खामगाव तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Revoke decision to hand over schools to private contractors – SFI demands
निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :
1. सर्व शासकीय विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने न भरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा भरण्यात यावी.
2. आमदार मंत्री खासदार यांच्या हितसंबंधांतील ९ कंपन्यांना कंत्राट देण्याचा शासन निर्णय रद्द करावा.
3. महाराष्ट्रातील ६२ हजार जिल्हा परिषद शाळा खाजगी कंपन्यांना देण्याचा शासन निर्णय रद्द करावा.
4. शासनाचे सर्व परीक्षा अर्ज निशुल्क स्वीकारावेत, पेपर फुटीचे प्रकार थांबवून पारदर्शकता आणावी.
5. महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागात रिक्त असलेल्या ६ लाख हून अधिक पदे तातडीने भरून कायम नोकर भरती करावी.
निवेदन देतेवेळी बुलढाणा जिल्हा समिती अध्यक्ष कॉ. सृष्टी कवीश्वर, बुलढाणा जिल्हा समिती सचिव कॉ. रितेश चोपडे, गो.से. महाविद्यालय युनिट मधील विजय, आशुतोष, हरीहर, ओम यांनी तसेच गिरीश उमाळे उपस्थित होते.