Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरवैद्यकीय क्षेत्रात संशोधन,माहिती आणि सुरक्षा महत्वाची : डॉ.संतोष घुले

वैद्यकीय क्षेत्रात संशोधन,माहिती आणि सुरक्षा महत्वाची : डॉ.संतोष घुले

जुन्नर / विजय चाळक : समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिटयूट संचलित समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने “वैद्यकीय परीक्षण संशोधन, वैद्यकीय परीक्षण माहिती व्यवस्थापन आणि औषध सुरक्षा” या विषयावर ५० तासाचे सर्टिफिकेट कोर्स (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

ब्रेकिंग : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक

वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक आणि त्याचे अनुमान या दोन्हीही मूलभूत संकल्पना असून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

वैद्यकीय परीक्षण संशोधन, वैद्यकीय परीक्षण माहिती व्यवस्थापन आणि औषध सुरक्षा (फार्माकोव्हिजिलन्स), आरोग्यचिकित्सा क्षेत्रातील संशोधन यांचे महत्व विशद करताना समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, माहिती आणि सुरक्षा खूप महत्वाची आहे.

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सुभाष कुंभार यांनी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व त्यातील नोकरीच्या संधी याबद्दल माहिती व मार्गदर्शन केले. सदर कोर्स साठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील तृतीय व अंतिम वर्षातील शुभम डेरे, प्रणय आवटे, वैशाली मोहपे, प्रतीक्षा भोर, ऋतुजा दळवी, आरती पराड, ऋतुजा डोके, साक्षी गवळी, ऐश्वर्या वाळके, अदिती थोरात, प्रणाली कुळवाडी, श्वेता मुळे, रुपाली पडवळ, माधवी म्हसे, ऋतुजा भांड इ. विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले.

जुन्नर : मांदारणेच्या जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

या कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा.सचिन दातखिळे, प्रा.नितीन महाले, प्रा.मिनाज इनामदार, प्रा.सागर तांबे, प्रा. राहुल लोखंडे, प्रा.स्नेहल गंधट यांनी केले.


संबंधित लेख

लोकप्रिय