पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी-चिंचवड सह पश्चिम महाराष्ट्राला दिवसभर भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या दोन्ही शहरात अहोरात्र पाऊस सुरू आहे. (Red alert)
सध्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली असून येथील पुलाची वाडी व प्रेमनगर येथील 100 घरांचा व येथील काही व्यावसायिकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिराजवळील पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात पाणी साचले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. (Red alert)
खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या आपत्कालीन विभागाने शहरात आणि विशेषतः नदीकाठच्या उपनगरात यंत्रणा सज्ज केली आहे. खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या गावांना सावधान करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा :
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल
बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती
पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर