हडपसर / डॉ.अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध आणि महात्मा फुले महाविद्यालय पिंपरीयांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ग्रंथ महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानसरिता ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. स्वारगेट येथील कर्मवीर भाऊराव पुतळा येथून गरवारे महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे संयोजन दिनकर मुरकुटे यांनी केले.
या ग्रंथदिंडीमध्ये तीनही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 160 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या दिंडीचे आयोजन फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित केलेल्या पुणे ग्रंथ महोत्सवाच्या वतीने करण्यात आले होते.

या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वेशात आलेल्या एस. एम. जोशी कॅालेजमधील विद्यार्थी हनुमंत भंडारी एफ.वाय.बी.ए.) हा होता.
ज्ञानसरिता ग्रंथदिंडी साठी प्र.प्राचार्य डॉ.किशोर काकडे, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, प्र.प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, प्रा.डॉ.प्रभंजन चव्हाण, डॉ.संदीप ननावरे, डॉ.भारती यादव, ग्रंथपाल बद्रीनाथ ढाकणे, प्रा. बाळासाहेब कलापुरे यांनी सहभाग घेऊन दिंडीचे नेतृत्व केले. या ज्ञानसरिता दिंडीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
