Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भारतीय संविधान वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची – डॉ.श्रीरंजन आवटे 

हडपसर / डॉ.अतुल चौरे : राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा म्हणजे सध्याचा पुरोगामी महाराष्ट्र आपण पाहत आहोत. सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली नसती तर आपल्या माता भगिनी होऊ शकल्या नसत्या. महापुरुष जसे जसे बोलायचे तसे वागायचे. त्यामुळे त्यांनी समाजामध्ये आपल्या आदर्श निर्माण केला. संविधान निर्माण करणारा माणूस महाराष्ट्राने देशाला दिला. संविधानाच्या माध्यमातून माणसाने माणसाला माणूस जगण्याचा हक्क निर्माण करून दिला. त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आह़े. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष महाराष्ट्रामध्ये जन्मले व त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली, असल्याचे प्रतिपादन डॉ.श्रीरंजन आवटे यांनी केले. 

---Advertisement---

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात आला. शरदचंद्रजी पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील सुप्रसिध्द लेखक व कवी डॉ. श्रीरंजन आवटे उपस्थित होते.

प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप तुपे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे, पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार हे उपस्थित होते.

---Advertisement---

पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे पाटील यांनी पद्मविभूषण खासदार शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, आपण सर्वांनी संविधान वाचणे आवश्यक आहे. संविधानामुळे भारतीय लोकशाही टिकून आहे. संविधानामध्ये मनुस्मृतीचा शिरकाव होऊ नये यासाठी काम करणे आवश्यक आह़े. शरदरावजी पवार हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये संगणक क्रांती केली. तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. असे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी तर पाहुण्यांची ओळख प्राचार्य डी. जी. जाधव तर आभार प्राचार्य सुजाता कालेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नयना शिंदे व प्रा.अमृता मुखेकर यांनी केले. 

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्राचार्य रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका झीनत सय्यद, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि साधना शैक्षणिक संकुलातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HSL

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles