मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या घटल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात २७०१ रूग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत १७५६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज घडीला ९ हजार ८०६ असून मुंबईत सर्वाधिक ७ हजार सक्रिय रूग्ण आहेत.
राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रूग्ण वाढत आहेत. दोन दिवसांपासून ही रूग्ण संख्या एक हजारांहून जास्त होत आहे. आज राज्यात २७०१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर १३२७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. मुंबईत दिवसभरात १७५६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्ण वाढीमुळे प्रशासनाला धडकी भरली असून मुंबईसह उपनगरांचाही धोका वाढला आहे. ही रूग्ण वाढ अशीच सुरू राहिली तर पुन्हा मास्क सक्तीही होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही काही नेत्यांकडून देण्यात आले आहेत.
देशातल्या सक्रिय रूग्णांची संख्या २८ हजारांवर पोहचली आहे. देशात २८ हजार ८५७ सक्रिय रूग्ण आहेत.