Sunday, May 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राजू शेट्टी ‘या’ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढा; तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इतक्या’ जागा लढणार

सांगली : लोकसभेच्या निवडणुकाचे वारे आतच वाहू लागले आहे. राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक ही आता तयारला लागले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने कंबर कसली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता जागांची घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या सहा जागांवर निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर लोकसभेत आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असेही स्पष्ट केले. (Raju Shetti Loksabha Elections)

सांगली येथे पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ED चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका” असा टोला त्यांनी भाजप सरकाराला लगावला. यामध्ये माझा सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी भापजला लगावला. तर लोकसभा निवडणुकीत मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभेसाठी अनेक राज्याबाहेरील राजकीय पक्षाचं लक्ष महाराष्ट्रावर आहे. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत.

---Advertisement---

पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

---Advertisement---

पुणे‌ येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles