नवी दिल्ली : भारतीय लष्करी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, निवड प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्याने अनेकांची लष्करी सेवेची संधी हुकते. मात्र आता केंद्र सरकारने आणलेल्या अग्नीपथ योजनेतून तरूणांना 4 वर्ष भारतीय लष्करात दाखल होता येणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज एका विशेष कार्यक्रमात नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेची घोषणा केली आहे. ‘अग्निपथ’ या योजने अंतर्गत तरूणांची 4 वर्षांसाठी लष्करात भरती होणार असून 17.5 वर्षे ते 21 वर्ष वयोगटातील युवकांची भरती करण्यात येणार आहे. यात 10 वी, 12 वीचे विद्यार्थी अग्निवीर भरती योजनेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षा आणि मेरिटच्या आधारावर ही भरती होणार आहे. 90 दिवसांत अग्निवीरांची भरती होणार आहे. या योजनेत भरती झालेल्या तरुणांना ‘अग्नीवीर’ असे खास नाव दिले जाणार आहे. त्यांना 10 आठवडे ते 6 महिन्यांचं लष्करी प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. या योजनेतून युवकांना लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ 500 जागांसाठी होणार भरती
दरवर्षी अग्नीपथ या योजनेत साधारणत: ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षांसाठी तरूणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. चार वर्षांनी त्यातील २५ टक्के तरूणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल. सेवाकाळात शहीद झाल्यास कुटुंबाला 1 कोटी रूपये व्याजासह मिळतील. तर अग्निवीर सेवाकाळात अपंग झाल्यास 44 लाख निधी दिला जाणार आहे.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri @narendramodi today approved an attractive recruitment scheme for Indian youth to serve in the Armed Forces.
The scheme is called AGNIPATH and the youth selected under this scheme will be known as Agniveers. pic.twitter.com/ogrikrmhcz
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 14, 2022
या योजनेनुसार भू-दल, वायू दल आणि नौदलात प्रत्येक वर्षी 45,000 ते 50,000 जणांची अधिकारी पदाच्या खाली नियुक्ती करण्याची योजना आहे. ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोनदा होईल. अग्निवीरांना त्यांच्या कार्यकाळानंतर प्रश्तीपत्रक व डिप्लोमा देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून भूदल, हवाई दलात, नौदलात भरती झालेली नाही. लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (JCOs) ची एक लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख