नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांना ईडी कार्यालयात सोडताना त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. राहुल यांना सोडल्यानंतर प्रियांका तेथून निघून गेल्या.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ सुरू असून, त्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
राहुल प्रियंका गांधींसह त्यांच्या घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. काँग्रेस मुख्यालयात त्यांनी सर्व काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर राहुल ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पायी चालत निघालेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान सुरजेवाला आणि पी चिदंबरम यांनाही बरगडीला दुखापत झाली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर थांबल्यानंतर दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. ते पोलिसांना म्हणाले- तुम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही.
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी