Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचा निकाल केला जाहीर. वाचा सविस्तर

---Advertisement---

पुणे : –  अंतिम वर्षाच्या परिक्षेचा वाद न्यायालयात गेला असला तरी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे काम विद्यापीठाने सुरु केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेतील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

लॉकडाऊनमुळे प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परिक्षा घेण्यात आलेल्या नव्हत्या. त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी मागील गुणवत्तेचा विचार करून गुणांचे मुल्यांकन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्या पार्श्वभूमीवर आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

---Advertisement---

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या http://results.unipune.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल ऑनलाईन जाहीर केले आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे देखील निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा हा न्यायालयात आहे, सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles