Pune : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राज्यभर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच तपासणी दरम्यान पुणे शहरातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान तब्बल 138 कोटी रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहकार नगरमध्ये नियमित नाकाबंदी दरम्यान एमएच 02 ईआर 8112 या क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती. कंटेनरमधून तब्बल 138 कोटी रुपयांचं सोनं आढळलं.
पोलिसांनी कंटेनर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे सोन्याच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं मागितली असता, त्यांच्याकडे रीतसर कागदपत्रं होती. तपासादरम्यान समोर आलं की हे सोनं डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचं होतं.
या कारवाईमुळे पोलिसांनी निवडणूक काळात वाहन तपासणीची प्रक्रिया किती महत्वाची ठरू शकते, याचा प्रत्यय दिला आहे. या मोठ्या तपासणीमुळे शहरात आणि राज्यभरात चर्चा रंगली असून, सोन्याच्या वाहतुकीची सखोल चौकशी सुरू आहे.
आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यभरात तपासणी प्रक्रिया कडक करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश निवडणूक काळात कोणत्याही अवैध गोष्टींना आळा घालणे आहे.ही कारवाई निवडणूक आचारसंहितेच्या काळात घडल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. पुण्यातील या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Pune
हेही वाचा :
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित