Surendra agarwal : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातानंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर चौफेर टीका झाली. या अपघात (Pune Accident) प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल (Surendra agarwal) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
पुणे अपघात प्रकरणाची पोलिसांनी अनेक पातळ्यांवर तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहे. आज पुन्हा या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याचे आजोबा आणि विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) पोलीस कोठडीत आहे, तर त्यांचा नातू आणि अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल बालसुधारगृहात आहे. त्यामुळे अग्रवालांच्या घरातील तिन्ही पिढ्या आता तुरुंगात आहेत. तसेच आता या प्रकरणात पोलिसांनी ही सातवी अटक केली आहे.
Surendra agarwal यांना का केली अटक?
अपघात झाल्यानंतर आपल्या अल्पवयीन नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याचा बळी देण्याचा सुरेंद्र कुमार यांचा डाव होता. आरोपी अग्रवाल कुटुंबाकडून अपघातादरम्यान गाडी ड्रायव्हर चालवत होता, असा दावा करण्यात आला होता. सुरेंद्र अग्रवाल यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवत ड्रायव्हरला धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच गुन्ह्याच्या अंतर्गत पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहे. कलम 365 आणि 368 कलम लावले आहे.
दरम्यान, सुरेंद्र अग्रवाल हे पुण्याच्या बांधकाम व्यवसायातील मोठं नाव आहे, मात्र सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आता इतरही काही गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामध्ये त्यांचा छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप आहे, तसेच या प्रकरणी एक खटला सुद्धा त्यांच्यावर सुरु आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!
मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!
मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा