Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात उच्च प्रतीचा कांदा सरासरी 20 ते 23 रूपये प्रती किलो विक्री होणारा कांदा आठ दिवसांतच 12 ते 15 रूपये किलोवर घसरल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने कांद्याला हमीभाव जाहिर करावा अशी मागणी सातत्याने कांदाउत्पादक शेतकर्‍याकडून होत आहे. Onion prices fall in Pune

---Advertisement---

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रब्बी हंगामात इतर पिकांपेक्षा कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना कांदा पिकातून होती. मात्र, कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जुन्नर तालुक्यातील कांदाउत्पादक शेतकर्‍याची गैरसोय टाळण्यासाठी ओतूर, आळेफाट व जुन्नर येथे बाजार समितीकडून कांदा लिलाव होता. त्या ओतूर व जुन्नर येथे प्रत्येक गुरूवार व रविवारी कांदा लिलाव होतात. (PUNE)

---Advertisement---

दरम्यान, आळेफाटा येथे मंगळवार, शुक्रवार व रविवारी कांदा लिलाव केले जातात. ओतूर, आळेफाटा उपबाजारात रविवार (दि. 10) ते रविवार (दि. 17) दरम्यान 2 लाख 12 हजार 337 कांदा पिशवीची आवक झाली. आळेफाटा येथे काही दिवसांपूर्वी कांदा 17 रुपये किलो होता. तो रविवारी 12 रुपये किलो इतका नीच्चांकी घसरला. पाच दिवसांत एका किलोला 5 रुपये भाव कमी झाला.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles