PMC Recruitment 2022 : पुणे महापालिकेच्या वतीने लवकरच विविध पदांसाठी 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात लिपिक पदापासून कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक यासह अग्निशमन विभागातील 100 जागांचाही समावेश असणार आहे.
या भरतीसाठी रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जाहिरात निघेल. ही पदभरती केंद्र सरकारच्या आयबीपीएस या संस्थेकडून करून घेतली जाणार आहे. त्यासाठी करार केला आहे. पदभरतीत पारदर्शकता राहावी आणि कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
ही भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या ‘आयबीपीएस’ संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार करण्यात आला आहे. पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह इतर शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी