जुन्नर : जुन्नर- आपटाळे मार्गावरील वाघाळे फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक भास्करराव यशवंत पानसरे (वय-५५, रा. जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. आपटाळे येथून परतताना त्यांच्या दुचाकीला (एमएच १४-इटी ६७२६) अज्ञात वाहनाने उडविले व चालक फरार झाला.
नेहमी हेल्मेट वापरणारे पानसरे यांनी यावेळी हेल्मेट घातले नव्हते. ते एका कार्यक्रमात गेले होते. तांबे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात ते गेल्या ३० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत होते. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या पानसरे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे तांबे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. जुन्नर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार सीसीटीव्हीच्या आधारे फरार वाहनाचा शोध घेत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख