पुणे / क्रांतीकुमार कडुलकर – एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. (Pune)
पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा सुविधा मिळण्यास होणारा विलंब रुग्णांच्या समस्यांमध्ये भर पाडणारे आहे.
अशा परिस्थितीत कम्यूनिटी कॅन्सर सेंटर्स रूग्णांना अतिशय उपयोगी पडतात जिथे मोठ्या हॉस्पिटल इतकेच योग्य निदान, योग्य उपचार, अनुभवी कर्करोग तज्ञांकडून, रुग्णांच्या जवळच्या परिसरात आणि वाजवी दरात दिले जातात अशी माहिती एम. ओ. सी. चे कर्करोगतज्ञ डॉ. तुषार पाटील आणि डॉ. रेश्मा पुराणिक यांनी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
एम. ओ. सी कल्याणी नगर हे ३० बेड्सने सज्ज सेमी आय.सी.यू. युक्त कॅन्सर सेंटर असून इथे सर्व प्राइवेट मेडिकल इन्शुरन्स आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थीना उपचार घेता येणार आहेत अशी माहिती एम. ओ. सी.चे कर्करोगतज्ञ डॉ. अश्विन राजभोज आणि डॉ. आस्मा पठाण यांनी दिली. (Pune)
एम. ओ. सी. कल्याणी नगर हे पुण्यातील चौथे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर असून या पूर्वी पुण्यामध्ये शिवाजी नगर, पिंपरी चिंचवड आणि स्वारगेट येथे एम. ओ. सी. कम्यूनिटी कॅन्सर सेंटर्स कार्यरत आहेत. कॅन्सरच्या ९० ते ९५ टक्के रूग्णांना उपचारादरम्यान केमोथेरपी ठराविक कालावधीपर्यंत देणे गरजेचे असते आणि त्याचा खर्च इतर उपचारांपेक्षा अधिक व वारंवार होणारा असतो.
या खर्चाला बर्याच अंशी आळा घालण्यात कम्यूनिटी कॅन्सर सेंटर मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. रुग्णांचे त्रास कमी करण्याच्या दृष्टीने अशी सेंटर पर्यायी व्यवस्था म्हणून आपले महत्व प्रस्थापित करीत आहेत.