Saturday, June 29, 2024
Homeजिल्हाPune : एक्झिट एक्झाम ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

Pune : एक्झिट एक्झाम ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

Pune, (राजेंद्रकूमार शेळके) : नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, फार्मा लाईफ अकॅडमी व विनेटर करिअर आयोजित महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ प्रस्तुत डिप्लोमा इन फार्मसी करिता ऑनलाइन कार्यशाळा नुकतीच पार पडली.सदर कार्यशाळे करिता एक्झिट परीक्षा पुस्तकाचे लेखक व भारती विद्यापीठ फार्मसीचे प्रा. प्रविण जावळे, फार्मालाइफ अकॅडमीचे संचालक प्रा. सुनील बाकलीवाल व इंडस्ट्री तज्ञ म्हणून डॉ. अतुल दाढे त्यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. (Pune)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅशनल फार्मसी वेल्फेअर चे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल यांनी केले. नॅशनल वेल्फेअर असोसिएशनचे उद्दिष्ट व भूमिका त्यांनी यावेळी विशद केली. मेगा जॉब हेअर 2024 ते यशस्वी आयोजन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या सहाय्याने केले गेले याचाही विशेष उल्लेख करून त्यांनी मंडळाचे आभार मानले.

ऑनलाइन कार्यशाळेचे उद्घाटन तंत्र शिक्षण मंडळाचे पुणे विभागीय उपसचिव शाहीद उस्मानी यांनी केले. याप्रसंगी त्यांनी एक्झिट परीक्षे बद्दल एकूणच फार्मसी क्षेत्राची मानसिकता व मुलाकरिता हे वेबिनार उपयुक्त ठरणार आहे. अशा विद्यार्थी केंद्रित उपक्रमाकरिता तंत्र शिक्षण मंडळ कायम सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, डॉ. महेंद्र चितलांगे त्यांचे त्यांनी आभार मानले. मंडळाकडून छत्रपती संभाजी नगरचे उपसचिव मा अक्षय जोशी हे देखील आवर्जून उपस्थित होते.

एक्झिट परीक्षेच्या संदर्भातील शिक्षकांची व मुलांची मानसिकता, एक्झिट परीक्षेचे स्वरूप व त्याकरिता सामोरे जाण्याच्या पद्धती याविषयी प्रा. प्रवीण जावळे यांनी भाष्य केले. प्राध्यापक सुनील बाकलीवाल् यांनी एक्झिट एक्झाम परीक्षे करिता विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी उदाहरण सहित स्पष्ट केली. (Pune)

तसेच या परीक्षेच्या तयारी करिता अभ्यासाचे काय सूत्र असले पाहिजे याचे देखील सविस्तर विवेचन त्यांनी यावेळी केले. उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्हणून डॉ. अतुल दाढे यांनी उद्योग क्षेत्राने या परीक्षेचे स्वागत केले आहे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये सक्षम फार्मासिस्ट करिता एक्झिट एक्झाम ही फार उपयुक्त ठरणार आहे. जगभरामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा यापूर्वी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फार्मासिस्ट म्हणून जगभरामध्ये संधी देखील या परीक्षेच्या निमित्ताने मुलांना उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती दाढे यांनी यावेळी दिली.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा यांनी यावेळी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्रा. पोपटराव जाधव, डॉ संपत नवले, डॉ नरहरी पाटील, डॉ. सचिन दिघडे, डॉ. सचिन नितवे, डॉ. प्रताप भोसले, डॉ. योगेश बाफना, डॉ. पराग कदम, प्रा. तसलीम कुरेशी, प्रा अफरोज मुलानी, डॉ.सुजित काकडे, प्रा. कारखिले डॉ. स्वामी व प्रा.प्रशांत हंबर यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका बोरुडे यांनी केले. सदर ऑनलाइन मार्गदर्शन बाबत महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. (Pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय