रिक्षा चालक कष्टकऱ्यांचा आधारवड हरवला.
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:रिक्षा चालक कष्टकरी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र रिक्षा चालकांची बाजू लावून धरणारे तसेच त्यांचे प्रश्न सभागृहात मानून त्यांना न्याय मिळवून देणारे तसेच ए रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा ही संस्कृती पुण्यामध्ये ज्यांनी रुजवली, कोविड काळामध्ये रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कोविड काळामध्ये रिक्षा चालकांसोबत आरटीओच्या समोर आंदोलन केले, नेहमीच रिक्षा चालकांची कष्टकऱ्यांची बाजू लावून धरून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्षा चालक कष्टकऱ्यांचे फार मोठे हानी झाली असून त्यांचा आधारवड आणि हक्काचा माणूस हरवला अशी भावना रिक्षा चालकांच्या व कष्टकऱ्यांच्या मध्ये शोक काळा पसरली असून हळ व्यक्त केली जात आहे,
रिक्षा चालक कष्टकऱ्यांचा आधारवड हरवला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिले असून तमाम रिक्षा चालक व कष्टकऱ्यांच्या वतीने गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.