Tuesday, December 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न - "संघटन: नेतृत्व, हक्क आणि संघर्षाची...

Pune : पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न – “संघटन: नेतृत्व, हक्क आणि संघर्षाची कहाणी”

Pune : (क्रांतीकुमार कडुलकर) – साद पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित “संघटन: नेतृत्व, हक्क आणि संघर्षाची कहाणी” या श्री. प्रकाश शरद वीर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजगुरुनगर येथे उत्साहात पार पडला. (Pune)

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त श्री. रविराज इळवे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुजाताताई इळवे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने लेखक प्रकाश शरद वीर यांनी पुस्तकाचे महत्त्व उलगडून सांगितले. ते म्हणाले, “हे पुस्तक कामगार, व्यवस्थापन, आणि युनियन पदाधिकारी यांच्यातील संवाद, नातेसंबंध, आणि सहकार्य यांची प्रभावी मांडणी करते. आधुनिक काळातील युनियन नेतृत्वासाठी हे प्रेरणादायी मार्गदर्शन असून, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील सहकार्याचा महत्त्वाचा संदेश देणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.”

साद पब्लिकेशन, पुणे हे प्रेरणादायी आणि दर्जेदार साहित्य प्रकाशित करणारे एक अग्रगण्य नाव आहे. त्यांनी विविध क्षेत्रांतील लेखकांचे दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवत, कामगार क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. (Pune)

या कार्यक्रमादरम्यान, कामगार, व्यवस्थापन, आणि युनियन प्रतिनिधींना एकत्र आणत संवाद, सहकार्य, आणि एकत्रित प्रगतीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगुरुनगर कामगार कृती समितीचे श्री.भरत उढाणे यांनी केले.

या विशेष सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे चाकण विभाग प्रमुख श्री. अविनाश राऊत, गुणवंत कामगार श्री. रामदास सैंदाणे , साद पब्लिकेशनचे श्री. दत्तात्रय दगडे, तसेच अजय पवार, दीपक जगताप, सागर थिटे, विकास शहाणे, दीपक निकुमे, प्रकाश पठारे, कमलेश गावडे, बाबासाहेब वाणी, गोकुळ भामरे, अनिल कुमार सिंग, आणि पंकज तिवारी यांचा समावेश होता.

“संघटन: नेतृत्व, हक्क आणि संघर्षाची कहाणी” हे पुस्तक कामगार चळवळ, नेतृत्व, आणि व्यवस्थापन यामधील महत्त्वाचे पैलू उलगडत आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय