Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुणे : इंधन दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाचे पेट्रोल पंपांवर मूक निदर्शने

पुणे : इंधन दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाचे पेट्रोल पंपांवर मूक निदर्शने

पुणे : “बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार!” हा तद्दन खोटा नारा देऊन २०१४ साली सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील कुठल्याही घटकाचा विचार न करता अत्यंत क्रूरपणे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरूच ठेवली आहे. चार राज्यांत निवडणूक असताना १३७ दिवस ठप्प असलेली इंधन दरवाढ निवडणुकीनंतर अक्राळ-विक्राळ रूप घेत सर्वसामान्य जनतेच्या खिशावर अक्षरशः दरोडा टाकत आहे. अशी टिका करत आम आदमी पक्षाच्या वतीने राज्य संघटक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मूक निदर्शने करण्यात आली. आपचे कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन उभे होते. 

सर्वसामान्य नागरिकांनी महागाईमुळे त्यांची होत असलेली होरपळ व्यक्त केली. इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी आपकडून एक मोबाईल क्रमांक (Mobile number) देण्यात आला ज्यावर नागरिक मिस कॉल देऊन आपला निषेध नोंदवत होते. अवघ्या २ तासांत सुमारे १००० नागरिकांनी मिस कॉल देऊन आपला निषेध नोंदवला. शहरातील जवळपास १५ पेट्रोल पंपांवर ही मूक निदर्शने करण्यात आली. 

शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी

पुणे मनपासमोरील हिरवळीवर जाण्यास नागरिकांना मनाई करणारे आदेश मागे घ्यावेत : विजय कुंभार

इंधन दर कमी करून नागरिकांना महागाईपासून दिलासा देणे ही राज्य आणि केंद्र सरकार दोघांची जबाबदारी आहे परंतु दोन्ही सरकारे मात्र महागाईकडे दुर्लक्ष करून संपूर्ण लक्ष भोंग्याच्या राजकारणाकडे देत आहे. आम आदमी पक्ष या गलिच्छ राजकारणात न अडकता जनतेच्या प्रश्नांवर सातात्याने लढा देत आहे व यापुढे देखील हा लढा अजून तीव्र करण्यात येईल.

“इंधन दरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. करोडो घरांचे अर्थकारण बिघडले आहे. अशा वेळी सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. आम आदमी पक्ष सद्या चालू असलेल्या धर्मांध राजकारणात न अडकता जनसामान्यांच्या प्रश्नावर काम करण्यात नेहमी अग्रेसर राहिला आहे आणि इथून पुढेही अग्रेसर राहील”

– विजय कुंभार, आप राज्य संघटक

“ही निदर्शने ऑफिशियल सुरुवात आहे, जोपर्यंत नागरिकांना इंधन दरवाढीपासून दिलासा मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे निषेध कार्यक्रम सुरू राहतील.”

– सेंथील अय्यर – समन्वयक 

 आप इंधन दर वाढ विरोधी मोहीम समन्वयक

या आंदोलनात पियुष हिंगणे, वैशाली डोंगरे, दत्ता जाधव, सुनंदा जाधव, अभिजित गायकवाड, फॅबियन सॅमसन, रोहन रोकडे, वैशाली डोंगरे, विठ्ठल नलावडे, अमोल काळे, ऍड. दत्तात्रय भांगे, आनंद वांजपे, सुशील बोबडे, किरण कांबळे, आरती करंजवणे, ज्योती ताकवले, शेखर ढगे, वैभव, किर्तीसिंग चौधरी, प्रतीक बनसोडे, नितीन अडगले, राहुल म्हस्के, दिनेश मोरे, अभिमान विटकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.

आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख

डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय