नाशिक : महाराष्ट्र राज्य घरकामगार मोलकरीण सामाजिक सुरक्षा मंडळास 2022 – 2023 च्या राज्य अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून पूर्णवेळ कर्मचारी नेमणे मागणी आयटक कामगार संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भिराज दराडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य घरकामगार मोलकरीण सामाजिक सुरक्षा मंडळ वतीने कोरोना काळात 1500 रुपये मदत केल्याबद्दल आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य घरकामगार मोलकरीण फेडरेशन वतीने आभार मानण्यत आले आहे. तसेच ही मदत आजही सर्वाना मिळालेली नाही त्यामुळे योजना सुरू ठेवावी. व 60 वर्षे वरील घरकामगार महिलांना ही 1500 रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे.
आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम, अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय
तसेच 2022 – 2023 च्या महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र तिल घरकामगार (मोलकरीण) साठी आर्थिक भरीव तरतूद करून घरकामगार सामाजिक सुरक्षा मंडळ च्या वतीने घरकामगार च्या पाल्याना शिष्यवृत्ती, विमा, तसेच सन्मान धन, आदी योजना चा लाभ सुरू करावा. योजना राबविण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी कर्मचारी नेमणूक करा. तसेच कामगार उपयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे त्वरित भरावीत. अशी मागणी आयटक च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शहराध्यक्ष. मीना आढाव, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. राजू देसले, संघटक कॉ. स्वामिनी बेंडकुळे, नूतन सोनवणे, मीना जाधव, कल्पना पाटेकर, कल्पना भालेराव, छाया वराडे, मनिषा चव्हाण, चित्रकला मोगल, अल्का टिळे, सुरेखा उगलमुगले, सुमन साळवे, अर्चना उगलमुगले, रेणुका पवार, गंगुबाई गोडे, नलिनी सोनार, विमल मोंढे, कामिनी झुरडे, कविता झुरडे आदींसह उपस्थित होते.
तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!