सांगली : गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढी (Price Hike) च्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist party Of India) सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी पेट्रोल-डिझेलवरील केंद्र सरकारच्या करांमध्ये त्वरित ५० टक्के कपात करावी, गॅसच्या किंमती त्याच्या खऱ्या उत्पादन खर्चानुसार आकारून, त्या ५०० रुपये प्रति सिलिंडरपर्यंत खाली आणा. पेट्रोल-डिझेलच्या किंमत निर्धारणाचे “आयात सममूल्य धोरण” रद्द करा, प्रत्यक्ष आयात व उत्पादन-वितरण खर्च या सूत्रानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती आकारा, आदी मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, रेहाना शेख, वसंत कदम, दिलशाद टिनमेकर, जोहरा नदाफ, तुळशीराम गळवे, संजय मोहिते यांनी केले.
शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी
10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी