Tuesday, December 17, 2024
Homeजुन्नरप्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात साजरी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात साजरी

जुन्नर (रफिक शेख) : इस्लाहे माशरा फाउंडेशन यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त लहान व मोठ्या मुलांचे प्रश्न उत्तरचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न उत्तरे विचारली जातात. हा कार्यक्रम सुमारे 13 वर्षापासूुन जुन्नर शहरात आयोजित केला जातो.

या वर्षी हा कार्यक्रम १ आणि २ ऑक्टोबर रोजी जुन्नर शहरातील कालिका मंदिर हॉल माईमुल्ला येथे संपन्न झाला. यावेळी शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय