Friday, December 27, 2024
HomeNewsमहाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाकडून रे नगर गृहप्रकल्पबाबत प्रगती व आढावा बैठक

महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाकडून रे नगर गृहप्रकल्पबाबत प्रगती व आढावा बैठक

सोलापूर : देशातील एकमेव असा सोलापूरच्या 30 हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर चे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडून वेगवान हालचाली सुरू असून नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणाऱ्या रे नगर घरकुलांच्या प्रगतीचा आढावा व पाहणी करिता राज्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव वलसा नायर व रे नगर ची पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रे नगर चे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली. Progress and review meeting regarding Ray Nagar housing project by Maharashtra Housing Ministry

 रे नगर गृहप्रकल्प हा शासनाच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून नोव्हेंबर, २०२३ मध्ये सदर गृहप्रकल्पातील घरकुलांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते वाटप होणार असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भाधीन पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने, सदर प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा, बांधकाम, अन्य संबंधित अडीअडचणी रे नगर प्रकल्पाबाबत अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रे नगर कुंभारी येथे आढावा बैठक संपन्न होणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय