Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयशिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन, राहुल गांधींचे देखील मराठीत ट्विट !

शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन, राहुल गांधींचे देखील मराठीत ट्विट !


नवी दिल्ली : देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील शिवरायांना अभिवादन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करून अभिवादन केले आहे, त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे कि, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”. असे म्हणत मोदींनी शिवरायांना वंदन केले आहेत. सोबतच मोदी शिवरायांना वंदन करतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मराठी भाषेत ट्विट केले आहे, त्यांनी म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

संबंधित लेख

लोकप्रिय